कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर अजय देवगण आणि सोनाक्षी सिंह यांनी खूपच धमाल केला. दोघेपण सन ऑफ सरदार या सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्यठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी या शोच्या वेळी होस्ट असलेल्या अमिताभ बच्चन सोबत चांगलीच धूम माजवली. काही दिवसापूर्वींच या शो मध्ये ‘जब तक हे जान’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडचा किंग असलेला शाहरुख खान व कैतरिना कैफ हे सहभागी झाले होते.
केबीसीमध्ये अजय देवगण आणि सोनाक्षी
या गेम शोप्रसंगी अजयने चांगला डान्स करीत प्रेक्षकाची मने जिंकली. तसे पहिले तर अजय देवगण सिनेमचे शूट सोडले तर तो सहज सहजी नाचण्यास तयार होत नाही. मात्र या शोदरम्यान त्याने बिग बी च्या विनतीला मान देऊन डान्स करीत यावेळी धमाका केला. यावेळी अमिताभने सोनाक्षी आणि अजयला त्यांच्या ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमातील ‘रानी तू मैं राजा’ या गाण्यावर डान्स करण्याची विनती केली होती. त्यावेळी त्याने हा डान्स केला.
यावेळी अमिताभ बच्चनने या गान्याची सिग्नेचर डान्स स्टेप करून स्टूडियोंमध्ये उपस्थित असलेल्याचे मनोरंजन केले. तिघांनी मिळून या गाण्यावर डान्स करून त्यांनी सर्वांची वाहवाह मिळवली. अजय आणि सोनाक्षीचा मस्ती आणि धमाल केलेल्या या शोचे प्रेक्षेपण १८ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता सोनी टिवीवर करण्यात येणार आहे.
