कैटरीना करणार शाहरुखसोबत स्टेज शो

‘जब तक हे जान’ हा सिनेमा केल्यानंतर सध्या कैटरीना आणि शाहरुख यांचे सुत चांगलेच जुळलेले दिसत आहे. येत्या डिसेंबरमध्ये सलमान खान आणि प्रियंका चोप्रा दुबईमध्ये स्टेज शो करणार आहेत. त्याचवेळी सलमानची एक्स गर्लफ्रेंड कैटरीना शाहरुखसोबत स्टेज शो करणार असल्याचे समजते.

याबाबत ऑर्गनाइजरने शाहरुखशी संपर्क साधला असून त्यांनी या शो साठी हिरोइन पसंत करण्यची जबाबदारी त्याच्यावर टाकली होती. त्यावेळी शाहरुखने कैटरीनाचे नाव घेतल्याचे समजते. गेल्या काही दिवसापासून कैटरीनाची शाहरुख खान सोबत एकादा स्टेज शो करण्याची इच्छा आहे. त्यामुळे तिनेपण होकार दर्शविला असल्याचे समजते. शाहरुखसाठी कित्येक स्टेजशोचे ऑर्गनाइज केलेले राशिद सईद सुद्धा सध्या किंग खान आणि कैटसोबत शो करण्याचे नियोजन करीत असल्याची चर्चा आहे.

आतापर्यंत या स्टेज शोची तारीख फिक्स झालेली नाही. लवकरच ही तारीख जाहीर करण्यात येणार असल्यचे समजते. या शोच्यापूर्वी शाहरुखने प्रियंका आणि करीना सोबत स्टेज शो केला आहे. मात्र कैटरीना सोबत शाहरुख खान पहिल्यांदा स्टेज शो करणार आहे. त्यामुळे या शो बाबत सर्वत्र उत्सुकता लागली आहे.