सन ऑफ सरदारलाच सपोर्ट करणार- काजोल

दिवाळीच्या दिवशी रिलीज होत असलेल्या ‘जब तक है जान’ आणि ‘सन ऑफ सरदार’ चा वाद गेल्या काही दिवसापासून चांगलाच रंगला आहे. कधी याबाबतीत अजय याचिका टाकतो तर कधी यश कैम्पच्या वतीने दादागिरी करून सिनेमा टोकिज मिळवण्यावरून वाद सुरु आहेत. असे असताना काजोल कोणाची बाजू घेणार यावरून वेगवगळे कयास लावले जात होते. याबाबत गेल्या काही दिवसापासून काजोल काहीच बोलण्यास तयार नसल्याने आणखीन उत्सुकता ताणली गेली होती. मात्र शेवटी काजोलने पती अजय देवगणाच्या ‘सन ऑफ सरदारला’च सपोर्ट करण्याचा निर्णय तिने घेतला आहे.

शाहरुख खानच्या सोबत बॉलीवुड मधील स्टार अभिनेत्री कैटरीना कैफ आणी अनुष्का शर्मा ही मंडळी ‘जब तक जान’च्या सपोर्टसाठी मैदानात उतरले होते. तर तिकडे अजयच्या सन ऑफ सरदार’ला साथ देण्यासाठी त्याचे दोस्त सलमान खान आणि संजय दत्त हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे एवढा मोठ मुद्दा असताना आतापर्यंत अजयची पत्नी काजोल मात्र मैदानात उतरली नव्हती. ही बाब अनेकजनाना खटकली होती. त्यामुळे प्रसार माध्यमाशी बोलतना काजोल म्हणाली, ‘ मी आगामी काळात ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमाचा साथ देण्याचे ठरविले आहे. मी ‘ सन ऑफ सरदार’ ला सपोर्ट करणार आहे. हा सिनेमा माझ्या होम प्रोडक्शनचा आहे. त्यामुळे मी अजयच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.’

Leave a Comment