काही दिवसापूर्वी ऐकण्यात आले होते की, समीरा रेड्डीचे इंडस्ट्रियल सिद्धार्थ माल्या सोबत अफेयर सुरु आहे. मात्र त्यानंतर काही दिवसानी समजले की… समीरा आजकल को-स्टार राणा दागुबती सोबत तिचा क्वॉलिटी टाइम घालवीत आहे. गेल्या काही दिवसापासून दोघेपण एकमेकासोबत फिरताना दिसत आहेत. त्यामुळे दोघाची हे मैत्री म्हणजे सध्या बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय झाली आहे.
समीरा रेड्डीचे लव कनेक्शन
काही दिवसापूर्वी सिड सोबत तिचे अफेयर सुरु असल्यची सर्वत्र जोरात चर्चा होती. मात्र तो समीराचा कज़न असल्याचे समजल्यानंतर त्याच्यासोबतची रिलेशनशिप सुरु होण्यापूर्वीच संपली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सुरु असलेली ही चर्चाच ठरली आहे. मात्र त्यामुळे समीरा आणि रानाचे अफेयर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत बोलताना समीरा म्हणाली, ‘राणाला मी फक्त फैशन टिप्स देते. त्याबदल्यात मला राणा हा फिटनेस टिप्स देतो. महत्वाची बाब म्हणजे दोघाची बर्थ डेट एकच आहे. त्यामुळे दोघांचे संबध चांगले आहेत. जरी सध्या काही अफवा पसरविल्या जात असल्या तरी दोघात फक्त मैत्रीच आहे.’
काही दिवसापूर्वीच समीरा आणि राणाने एका तेलुगू सिनेमात एकत्रित डान्स केला आहे. यामध्ये दोघांनी मिळून काही रोमांटिक सीन केले आहेत. त्यामुळे सध्या इंडस्ट्रीजमध्ये याची जोरदार चर्चा सुरु आहे.
