शाहरुख खानने घेतली अजयवर आघाडी

गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या शाहरुख खानचा ‘जब तक है जान’ ने अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’वर आघाडी घेतली आहे. दोन्ही सिनेमे दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाले आहेत. पहिल्या दिवसाची कमाई पाहता शाहरुखने अजयवर काहीसी मात केली असल्याचे चित्र दिसत आहे.

पहिल्या दिवसाची कमाई पाहता शाहरुख खानच्या ‘जब तक है जान’ ने पहिल्या दिवशी १४ कोटीची कमाई केली आहे. त्या तुलनेत अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमाने १० ते १२ कोटीची कमाई केली आहे. दिवाळीत रिलीज झालेल्या ‘जब तक है जान’ या सिनेमाला २५०० स्‍क्रीन्‍स उपलब्ध झाले आहेत. तर दुसरीकडे ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमासाठी दोन हजार स्क्रीन उपलब्ध झाले आहेत. ऐन दिवाळीत रिलीज झाल्याने दोन्ही सिनेमाना चांगला रिस्पोनास मिळाला असून त्यामुळे दोन्ही सिनेमे हिट होतील असे मानले जात आहे.

पाहिल्या दिवसाचे जरी हे आकडे असतील तर हे आकडे काही फायनल नाहीत. त्यामुळे येत्या आठवडाभरात कुठला सिनेमाने कमाई अधिक केली, हे सांगता येईल. तसे पहिले तर ‘जब तक है जान’ हा सिनेमा अधिक स्‍क्रीन्‍सवर दाखविला जात असल्याने त्या मानने त्याचे उत्पन अधिक असणार आहे. त्यामुळे आतच याबतीत काही मत व्यक्त करणे उचीत ठरणार नाही , असे मत सिनेक्षेत्रातील विश्लेषकाने व्यक्त केले आहे.

Leave a Comment