धोनीच्या समर्थनार्थ द्रविड सरसावला

माजी कप्तान राहुल द्रविड़ने सध्या कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या कामगिरीवर खुश दिसत आहे. भाविष्यात जर निवड समितीने जर तीन वेगवेगळ्या प्रकरासाठी वेगळे कर्णधार करावयाचे ठरवले तर धोनीवरील जबाबदारी काहीसी कमी होणार आहे. याबाबत चर्चा सुरु असताना राहुल द्रविडने मात्र धोनीची बाजू घेतली आहे.

द्रविड़च्या मते, ‘खेळाडू म्हणून धोनीचे प्रदर्शन चांगले आहे. त्याने फलंदाज आणि विकेटकीपर म्हणून आजपर्यंत चांगले योगदान दिले आहे. त्याची आतापर्यतची कामगिरी पाहता त्याच्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. गेल्या वर्षी आठ कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभव सहन करावा लागला असला तरी धोनीला अजून एक संधी दिली पाहिजे. धोनीमुळेच भारतीय संघाला विश्वचषक जिंकला आहे व टेस्ट रैंकिंगमध्ये नंबर वनवर त्याच्यामुळे पोहचलो आहेत हे विसरून चालणार नाही.’

धोनीने आतापर्यंत सर्व प्रकारात ३१८ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने २०३ सामन्यात भारताचा कर्णधार म्हणून काम केले आहे. धोनीने आगामी काळात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर फोकस करण्याचा सल्ला द्रविडने दिला. विराट कोहलीला भावी कप्तान होण्याची संधी आहे. त्याने आतापर्यंत तीन ही प्रकारच्या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे त्यामुळे त्याला कर्णधार म्हणून पहिले जात असल्याचे राहुल द्रविडने स्पष्ट केले.