प्रियंकाची होणार दिवाळी मिस

प्रियंका चोप्राची यावेळेस दिवाळी मिस होणार असे दिसत आहे. त्यामागील कारणपण तेवढेच महत्वाचे आहे. ती सध्या म्यूज़िक अल्बम तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे. ती हा अल्बम अमेरिकामध्ये तयार करीत आहे. त्यामुळे नेहमीच आपल्या कुटुंबाला प्राधन्य देणा-या प्रियंकाला यावेळेस मात्र दिवाळी मिस करावी लागणार आहे.

प्रियांका दिवाळीसाठी भारतात नसल्यची ही पहिली वेळ आहे. नाही तर ती तिच्या भावाचे कॉन्वोकेशन असो अथवा वडिलासाठी टैटू तयार करण्याचे काम असेल त्यासाठी ती सदेव आघाडीवर असते. प्रियंका ही फैमिली गर्ल आहे, याची कल्पना इंडस्ट्रीजमधील सर्वाना आहे. मात्र यावेळेस तिच्या बीजी शेडयूलमुळे तिला परीवारापासून हाजारो किलोमीटर दूर रहावे लागणार आहे. दिवाळीच्यावेळी घर सजविण्याची जबाबदारी ही प्रियांकावर असते. जर वर्षी तीच एका डेकोरेटरच्या मदतीने घर सजवीत असते.

प्रियंका सध्या कामाला महत्व देत असून तिच्या एका म्युजिक अल्बमचे काम गेल्या अनेक दिवसापासून रखडले आहे. त्या कामाला आता सुरुवात झाली असल्यने तिची परिवरासोबत दिवाळी साजरी करण्यची इच्छा असताना तिला कामात व्यस्त राहवे लागणार आहे.