सिने जगताचा बादशाह असलेला शाहरूख खान त्याच्या सुरुवातीच्या काळात, शहंशाह अमिताभ बच्चन (बिग बी) यांचे सिनेमे पाहणे खूप पसंत करत होता. सुरुवातीच्या काळात त्याला अमिताभ बच्चन सारखे व्हायचे होते. त्यासाठी तो खूप धडपड करीत होता. एक दोन सिनेमात त्याने बिग बी सोबत जरी काम केले असले तरी त्याला आगमी काळात बिग बी सारखे व्हायचे आहे.
शाहरूखने ‘मोहब्बतें’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमात बिग बी सोबत काम केले आहे. ‘बिग सीबीएस प्राइम’ च्या ‘इंडियाज प्राइम आइकॉन’ या शो प्रसंगी बोलताना शाहरूख म्हणाला, ‘अमिताभ बच्चनची महानता त्यांच्या सर्वच सिनेमामधून दिसून येते. या सर्वच सिनेमातून त्यांच्या जीवनाप्रती असलेला दृष्टीकोन समजून येतो. त्यामुळेच या सिनेमात अशी एक व्यक्ती आहे की, जी पुढे चालून अमिताभ बच्चन होते.’
‘बिग सीबीएस प्राइम’ च्यवतिने आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडियाज प्राइम आईकॉन’ या स्पर्धेतील अमिताभ बच्चन सुद्धा एक स्पर्धक आहेत. त्यामुळे हा शो काही दिवसातच खूप पॉपुलर झाला आहे.