वीना मलिक झाली ‘सीरियल किसर’

पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिक बॉलीवुडमधील नवीन ‘सीरियल किसर’ म्हणून ओळखली जाणार आहे. वीनाने किसिंगचा बादशाह असलेला इम्रान हाश्मीला पण मागे टाकले आहे. गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे की, वीना तिच्या ‘द सिटी दैट नेवर स्लीप्स’ या सिनेमात मोजता येणार नाहीत एवढे किसिंग सीन करनार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून वीना किसिंग सिनचे नवीन वर्ल्ड रिकॉर्ड करणार आहे, या रेकॉर्डची नोंद गिनीज बुकमध्ये होणार आहे. हा सिनेमा डायरेक्टर सतीश रेड्डी तयार करीत असून हारू रशीद त्यांना साथ देणार आहे.

याबाबत बोलताना वीना म्हणाली, ‘ मला वाटते की, या सिनेमासाठी किसिंग एक खास एक्सप्रेशन आहे. सिनेमाच्या दृष्टीने हा एक महत्वाचा विषय आहे. किसिंगच्या माध्यमातून जगातील सर्व आजार नाहीसे होतील. त्यामुळेच मी हा सीन करीत आहे. मला किसिंगच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये रिकॉर्ड करता आले. ही बाब माझ्या दृष्टीने गौरवशाली आहे.’

बिग बॉस मधुन चर्चेत आलेली वीना मलिकने आता बॉलीवूडमध्ये चांगलेच बस्तान बसविले आहे. तिने अल्पावधीतच बॉलीवुडमधील नवीन सीरियल किसर या नावाने ओळख निर्माण केली आहे. ‘द सिटी दैट नेवर स्लीप्स’ या सिनेमातील किसिंग सीन देऊन वीनाने लिपलॉकच्या बाबतीत प्रियंका चोप्राला दुस-या स्थनावर तर करीना कपूरला तीस-या स्थनावर ढकलून दिले आहे.