सिनेमा स्वीकारण्यापूर्वी सलमानच्या वडिलाची मदत घेते- सोनाक्षी

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सलमान आणि अक्षयसोबत काम करताना १०० कोटीच्या क्लबमध्ये एंट्री केली आहे. लवकरच ती अजय देवगनच्या  ‘सन ऑफ सरदार’ झळकणार आहे. सोनाक्षीने आतापर्यंत दमदार स्क्रिप्ट्स सादर केल्या आहेत. सर्वच तिचे सिनेमे १०० कोटीपेक्षा जास्त केल्याने सक्सेस झाले आहेत.

तिच्या या या यशाचे राज काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ती म्हणाली, ‘ मी कुठलाही सिनेमा साइन करण्यापूर्वी मी सलमान खानचे  वडील सलीम खान यांच्याशी चर्चा करते. त्यानंतरच मी त्या सिनेमामध्ये काम करायचे की नाही ते ठरवते. सलीमसर यांची ओळख  बॉक्स ऑफिसचा बेताज बादशाह म्हणून आहे. त्यामुळे बरेचजण त्यांच्याकडे सिनेमा स्वीकारण्यापूर्वी चर्चा करतात. त्यांनी जर स्क्रिप्टमध्ये दम नाही असे म्हटले तर मी सिनेमा स्वीकारत नाही. माझे व सलमान खानच्या कुटुंबाचे पूर्वीपासून संबध चांगले आहेत.’

त्यांच्या शिवाय मी सिनेमा स्वीकारत असताना पैरंट्सचा सल्ला घेते. सध्या इंडस्ट्रीमध्ये चांगले अनुभव येत आहेत. यश मिळाले तर सर्वाना चांगले वाटते त्यामुळे प्रत्येकजन खुश होतो. ‘जोकर’  हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला त्यामुळेच सिचुएशन बैलेंस करण्यचा सध्या प्रयत्न सुरु असल्याचेही सोनाक्षी म्हणाली.