जीवनावश्यक उपकरण यादीत गजराचे घड्याळ अव्वल

जगात विविध विषयांवर सतत सर्वेक्षणे घेतली जात असतात. अनेक वेळा या सर्वेक्षणांतून मजेदार निष्कर्ष निघतात. याचे एक चांगले उदाहरण म्हणजे नुकत्याच लाँग लास्टींग गॅजेटस किवा यांच्या विना आयुष्य जगता येणे अशक्य अशा उपकरणांची यादी बनविण्यासाठीही नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले आणि आजच्या आयपॅडच्या दुनियेत संशोधकांना असे आढळले की या यादीत प्रथम स्थान मिळाले आहे ते उशाशी असलेल्या आणि बरोब्बर ठरल्या वेळेला झोपेतून उठविण्याचे कार्य करणार्याद गजराच्या घडयाळाला.

घरातील वापराच्या वस्तूंत सर्वाधिक हायटेक गॅजेट म्हणून गजराच्या घडयाळाच पसंती मिळाली तर १० वस्तूंच्या या यादीत दुसर्याू क्रमांकावर आला टोस्ट सँडवीच टोस्टर, त्यानंतर अनुक्रमे पॉकेट कॅलक्युलेटर, नंतर गेमबॉय, इलेक्ट्रिक कार्व्हींग नाईफ, पॉप अप टोस्टर, ब्रेड मेकर, डिजिटल वॉच, व्हीसीआर व रेकॉर्ड प्लेअर यांचा नंबर लागला. विशेष म्हणजे सर्वेक्षणातील लोकांनी केवळ पसंती दर्शविली नाही तर ते आजही आपल्या घरात या वस्तूंचा नियमित वापर करतात असेही दिसून आले. सुमारे ३० लाख लोक आजही या वस्तू जुन्या जमान्यातील म्हणून फेकून न देता आवर्जून आणि अत्यंत उपयुक्त म्हणून वापरतात असे आढळले.

ब्रिटनमधील मॉडर्न जनतेच्या सर्वेक्षणात मात्र टॉप टेन गॅजेट मध्ये सर्वात प्रथम क्रमांकावर आला स्मार्टफोन. त्यानंतर ब्रॉडबँड, टिव्ही,लॅपटॉप, टॅब्लेट गेम, डिजिटल टिव्ही/प्लेअर/रेकॉर्डर, एमपी थ्री, ईरिडर आणि डीव्हीडी यांचा क्रमांक लागला.