काही दिवसापुर्वीच सलमान खान आणि कैटरीना कैफचा ‘एक था टाईगर’ हा सिनेमा रिलीज झाला. त्यावेळी कैटरीना कैफने अजमेरच्या शरीफ दरगाह येथे दुआ मागितली होती. त्यामुळेच तिचा ‘एक था टाईगर’ हा सिनेमा हिट झाला. येत्या काही दिवसातच कैटरीना आणि शाहरुख खान या दोघाचा ‘जब तक है जान’ हा सिनेमा रिलीज होत आहे. त्यासाठी कैटरीना आता अजमेरच्या शरीफ दरगाह येथे पुन्हा एकदा दुआ मागितली आहे.
पाच नोवेबर रोजी कैटरीना आपल्या मैनेजर सोबत सिनेमाच्या प्रमोशनमधून थोडा वेळ काढून अजमेरला जाऊन आली. सध्या शूटिंग आणि प्रमोशन या दोन्ही कामात ती व्यस्त आहे. मात्र त्या व्यस्त शेडूलमधून वेळ काढून ती अजमेर येथे दर्शनासाठी गेली होती. सध्या कैटरीना कैफ ही सलमान खान आणि शाहरुख खानच्या खूपच जवळ आहे. दोघा सोबत कैटरीनाचे चांगले संबध आहेत.
सलमान सोबतच्या रिलेशनबाबत बोलताना कैटरीना म्हणाली ‘आमचे एकमेकासोबत चांगले रिलेशन आहेत ते सतत शेयर करीत असतो. आम्ही दोघेपण खूप चांगले मित्र असून एकमेकाना समजून घेतो. दूसरीकडे शाहरुख खान सुद्धा एक चांगला अभिनेता आहे. सलमान व शाहरुखसोबत चांगले संबध आहेत. त्यामुळे दोघासोबत चांगले रिलेशन शेयर करीत असते.’ कैटरीनाचा जरी शाहरुख आणि सलमान जरी चेष्टा करीत असले तरी त्याचे काहीच वाटत नसल्याचे तिने स्पष्ट केले.