युरेनियम पुरवठा करारावर स्वाक्षर्याे होऊन दोन वर्षे लोटल्यानंतर आता कॅनडाने भारताला युरेनियम व न्यूकिलअर रिअॅक्टर्स पुरविण्यासबधीच्या करारावर शिक्कामोर्तब केले आहे. भारताचा अणु कार्यक्रम हा विकासासाठीच असल्याची खात्री पटल्याने भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग आणि कॅनडाचे पंतप्रधान स्टीफेन हार्पर यांनी निगोशिएशन पूर्ण केली. या करारासोबतच सामजिक सुरक्षेसह अन्य तीन करारांवरही स्वाक्षर्याू करण्यात आल्या असल्याचेही सांगण्यात येत आहे.
कॅनडा भारताला देणार युरेनियम
युरेनियमचे साठे असलेल्या देशांचा यादीत कॅनडाचा नंबर वरचा असून कॅनडा हा जगातील युरेनियम उत्पादक देशांतील महत्त्वाचा व मोठा देश आहे. मंगळवारी कॅनडाने भारताच्या चार मल्टीलॅटरल एक्स्पोर्ट कंट्रोल न्यूक्लिअर सप्लायर ग्रूपचे पूर्ण सदस्यत्व द्यावे यासाठी केलेली मागणीही कॅनडाने मान्य केली आहे.
