कंगनाच्या बहिणीवर आधारित रामूचा सिनेमा

बॉलीवूडमध्ये सध्या सत्य घटनेवर आधारित बरेचसे सिनेमे येत आहेत. त्यापैकी ब-याच सिनेमाची निर्मिती डायरेक्टर राम गोपाल वर्मा यांनी केली आहे. राम गोपाल वर्मा यांचा असिस्टट असलेला किशोर भार्गवचा ‘स्टाकर’ हा सिनेमा रियल इंसिडेंटवर आधारित असा आहे. या सिनेमाची कथा कंगना राणावतची मोठी बहिण रंगोली हिच्यावर २००६ मध्ये झालेल्या असिड हल्ल्यावर आधारित अशी आहे.

सूत्रोंने दिलील्या माहितीनुसार, खुद कंगना राणावत हिने रामूला तिच्या बहिणीवर झालेल्या या हल्ल्याची माहिती दिली. काही दिवसापूर्वीच, रामू कंगनाला ‘डिपार्टमेंट’ या सिनेमात संजय दत्तच्या अपोजिट घेण्याची प्लैनिंग करीत होता. त्यावेळी कंगनासोबत चर्चा करताना रामूला तिच्या बहिणीवर असिड अटैक झाल्याची माहिती मिळाली. कंगनाकडून असिड अटैकच्या बाबतीतला घटनाक्रम ऐकल्यानंतर आता रामूने असिड अटैकच्या ट्रेंडवर आधारित सिनेमा तयार करण्याची योजना तयार केली आहे.

या विषयावर आधरित ‘स्टाकर’ हा सिनेमाची निर्मिती तो करणार आहे. याबाबत कंगना रानवतची बहिण रंगोली हिची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ती म्हणाली, ‘मी अथवा ‘कंगनाने रामूला माझ्या असिड अटैक विषयी काहीच सांगितले नाही. या इंसिडेंटवर आधरित सिनेमा निर्मितीचा प्लैनिंग तो करीत आहे याबाबत मला काहीच कल्पना नाही. माझा ‘स्टाकर’ या सिनेमाच्या कथानकाशी काहीच संबध नाही.’ तर दुसरीकडे रामुने मी नाही तर माझा असिस्टट किशोर भार्गव हा ‘स्टाकर’ या सिनेमाची निर्मिती करीत असल्याचे सांगून त्याची बाजू स्पष्ट केली.