आगामी काळात येत असलेल्या ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमात सोनाक्षी सिन्हा एका अवखळ युवतीचा रोल करीत आहे. हा तिचा रोल रियल लाइफ पेक्षा खूपच वेगळा आहे. या सिनेमातील एका शूटसाठी तिला बाइक चालवावी लागणार होती. त्यासाठी तिने खूप सराव करूनही या सीनच्या शूटवेळी मात्र तिला घाम सुटला होता.
बाइक चालविताना सोनाक्षीला सुटला घाम
सिनेमाशी संबधीत सोर्सने दिलेल्या माहिती नुसार या सिनेमातील एका सीनसाठी सोनाक्षी सिन्हाला बाइक चालवावी लागणार होती. मात्र तिला बाइक चालवन्यास येत नसल्याने ती काहीसी नर्वस झाली होती. तिने तिच्या लाइफमध्ये कधीच टू-व्हीलर चालवली नव्ह्ती. त्यामुळे तिची चांगलीच पंचायत झाली होती. हा सीन देता यावा म्हणून तिने काही काळ ड्राइविंगची प्रक्टिस केली होती. हा सीन तिला इंडियन ड्रेसवर करायचा असल्याने तिच्या समोरील अडचणीत वाढच झाली होती.
ड्राइविंगची प्रक्टिस करत असताना सुरुवातीच्या काळात सोनाला थोडासा त्रास झाला. हा सीन चांगल्या पद्धतीने करता यावा म्हणून तिने खूप सराव केला असला तरी ती परफॉर्म करतेवेळी खूपच घाबरली होती. मात्र एकदाचा हा अवघड सीन करता आल्याने या एक्सपीरियंसमुळे सोनाक्षी खूप एक्साइटेड झाली होती. आता बाइक चालवता येत असल्याने त्याचा तिला आता खूप गर्व वाटत आहे.
