हैदराबाद: तब्बल ३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ घेऊन हैदराबाद विमानतळावर आलेल्या दोघांना कस्टम अधिकार्यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १० किलो मॅड्रिक्स हस्तगत करण्यात आले आहे.

हैदराबाद: तब्बल ३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ घेऊन हैदराबाद विमानतळावर आलेल्या दोघांना कस्टम अधिकार्यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १० किलो मॅड्रिक्स हस्तगत करण्यात आले आहे.
कस्टम अधिकाऱ्यांच्या तपासणीत अविनाश आणि रॉकी या दोघा जणांच्या सामानात अमली पदार्थ असल्याचे आढळून आले. हे दोघे हैदराबाद येथून मलेशियन एअरवेजच्या विमानाने क्वालालंपूर येथे निघाले होते.
या दोघांकडील अंमली पदार्थ जप्त करून गुन्हे रासायनिक प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठविण्यात आल्याचे कस्टमच्या सूत्रांनी सांगितले. या दोघांच्या अटकेने अंमली व्यापाराच्या आंतराराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता कस्टमच्या सूत्रांनी व्यक्त केली.