तीन वर्षानंतर तब्बू परतली

‘द नेमसेक’ आणि ‘चांदनी बार’ या सिनेमातून आपले अभिनय कौशल्यपणाला लावणारी बॉलीवूडची अभिनेत्री तब्बू काही काळ सिनेजगतातून गायब झाली होती. तब्बू आता तीन वर्षाच्या प्रदीर्घ विश्रातीनंतर ऑस्कर विजेता आंग ली की च्या सिनेमातून पुनरागमन करीत आहे.

यान्ना मार्टलीच्या ‘मेन बुकर’ या प्राइज विनिंग नॉवलवर आधारित असलेल्या “लाइफ ऑफ पी” या सिनेमातून तब्बू पुनरागमन करीत आहे. या सिनेमात ती पी नावाच्या मुख्य रोल करीत असलेल्याच्या आईची ती भूमिका करणार आहे. तब्बूने तिच्या अभिनयाच्या माध्यमातून हा रोल जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तीन वर्षपूर्वी ती “तो बात पक्की” या सिनेमातून बॉलीवूडमध्ये झळकली होती, त्यानंतर ती काहीसी गायब झाली होती.

याबाबत बोलताना तब्बू म्हणाली, ‘गेल्या काही दिवसापासून मी चांगल्या रोलच्या शोधात होते. ‘लाइफ ऑफ पी’ या सिनेमातून हवा असलेला रोल भेटल्याने या सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला. मला हवा तसा रोल मिळल्याने मी सध्या खुश आहे. मला पूर्वी पासून ‘क्राउचिंग टाइगर हिडन ड्रेगन’ आणि ‘ब्रोकबेक माउंटेन’ या सिनेमाचे डायरेक्टर असलेल्या आंग की यांचे सिनेमे आवडत असल्याने, या सिनेमात काम करण्यचा निर्णय घेतला.’