पुजारा,धवनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष

शनिवार पासून इंग्लंडविरुद्ध सुरु होणा-या सराव सामन्यात निवड समितीच्या सदस्याची नजर मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि सलामिवीर शिखर धवन यांच्या कामगिरीकडे असणार आहे.

रणजी सामन्यात यशस्वी कामगिरी करणा-या चेतेश्वर पुजाराने न्यूजीलैंडविरुद्ध ऑगस्टमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले होते. त्यामुळे या सराव सामन्याच्या शेवटच्या दिवशी घोषणा केल्या जान-या संघात त्याचा समावेश केली जाण्याची शक्यता आहे. शिखर धवनने २०१२-१३ मध्ये रणजी सामन्यात चागली कामगिरी केली आहे. त्यामुळे राखीव सलामीवीर म्हणून त्याचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे. दिल्लीचा फलंदाज असलेल्या शिखर धवनला पहिल्या सराव सामन्यात अभिनव मुकुंदच्या जागी खेलण्याची संधी होती, मात्र त्याचे नुकतेच लग्न झाल्याने त्या सामन्यात तो खेळू शकला नाही. या सराव सामन्यासाठी निवडलेल्या संघात कप्तान सूर्यकुमार यादव, शेमल वेंगाकर आणी बलविंदर सिंह संधू जूनियर यांचा पण समावेश करण्यात आला आहे. गेल्या वेळेसच्या सराव सामन्यात वेंगाकर याने ब्रेबोर्न स्टेडियम वरील सामन्यात सहा विकेट घेतल्या होत्या. याशिवाय हिकेन शाह, भविन ठक्कर, लेग स्पिनर सागर गोरिवाले, जावेद खान यांच्या कामगिरीकडे निवड समितीच्या सदस्याचे लक्ष असणार आहे.

पाहिल्या सराव सामन्यात इंग्लंडकडून कप्तान एलिस्टेयर कुक आणि समित पटेल या दोघांनी शतक ठोकली तर जोनाथन ट्रॉट आणि मैट प्रायरने अर्धशतक ठोकले. जलदगती गोलंदाज जेम्स एंडरसन आणि टिम ब्रेसननने शॉर्ट पिच गोलंदाजी करून आपली आक्रामकता दाखवली.