इंडस्ट्रीज मधील टॉपच्या नायीकामध्ये सध्या फिगर मेंटेन करण्याची स्पर्धा लागली आहे. त्यासाठी सर्वच नायिका सध्या जिमचा सहारा घेत आहेत, तर काही जन त्यासाठी डायटिंग करीत आहेत. मात्र एके काळी आपल्या हॉट फिगरने बॉलीवूडला भुरळ घालणा-या सोनाली बेंद्रे हिने मात्र सध्याच्या नायिकामध्ये दीपिका पदुकोननेच तिची फिगर मेंटेन केली असल्याचे म्हटले आहे.
दीपिकाने केला फिगर मेंटेन- सोनाली बेंद्रे
गेल्या काही दिवसापासून रियलटी शो ‘हिंदुस्तान के हुनरबाज़’ यामध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रे जज म्हणून सहभागी झाली आहे. सध्या सोनाली या शो च्या प्रमोशनसाठी सर्वत्र फिरत आहे. याबाबत बोलताना सोनाली म्हणाली, ‘या रियलटी शोमध्ये सहभागी होना-याना त्यांचे टैलेंट सर्वासमोर सादर करता येणार आहे. या शो मध्ये डांसर्स, सिंगर्स, मलखंब परफ़ॉर्म करणा-या आर्टिस्ट आणि माइम एक्ट करणारे आर्टिस्टला सहभागी होता येणार आहे.’
सिनेमातील करियरमध्ये सोनाली तिच्या हॉट फिगरमुळे नेहमीच चर्चेत राहत होती. आजच्या एक्ट्रेसेसमध्ये चांगला फिगर कोणाचा आहे, याबाबत सोनालीकडे विचरना केली असता ती म्हणाली, ‘ त्यावेळी केवळ माझ्या फिगरकडे सर्वांचे लक्ष होते. एक्टिंगकडे कोणीच लक्ष देत नव्हते. त्यावेळी मला परफेक्ट नाही तरी स्लिम अशी अभिनेत्री मानले जात होते. आता असे काही पहिले जात नाही. आता कर्वी फिगरचा काळ आहे. मला दीपिकाचा फिगर थोडा हॉट वाटतो. त्याशिवाय कैटरीना आणि प्रियंकाने सुद्धा बराच फिगर मेंटेन केला आहे.’
