
डहाणू: सत्तेत एकत्र राहून प्रत्यक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नाते विळ्या- भोपळ्याचे आहे; याचा जाहीर प्रत्यय हल्ली वारंवार येत आहे. अनुदानित सिलेंडर्सची संख्या न वाढविल्यास आंदोलनाची धमकी देणार्या राष्ट्रवादीला; राज्यात सर्वाधिक गुन्हेगार राष्ट्रवादीचे असल्याचा आरोप करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी टोला लगावला आहे.
