सॅमसंग गॅलॅक्सी प्रिमियम रशियात दाखल

अनेक तर्कविर्तकांना पूर्णविराम देत दक्षिण कोरियातील बलाढ्य इलेक्ट्रोनिक कंपनी सॅमसंगने त्यांचा गॅलॅक्सी प्रिमियम स्मार्टफोन जगात प्रथम रशियाच्या बाजारपेठेत सादर केला आहे. अर्थात या स्मार्टफोनची किमत अद्यापी गुलदस्त्यात असली तरी स्पोर्टी लूकचा हा स्मार्टफोन गॅलॅक्सी एस थ्री आणि गॅलॅक्सी नेक्ससचया वारसदार आहे असे सांगण्यात येत आहे.

या स्मार्टफोनला ४.६५ इंचाचा एचडी सुपर अमोलेड डिस्प्ले, अँड*ाईड ४.१ , आठ मेगापिक्सलचा रिअर शूटर व १.९ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आला आहे. बेस्ट फोटो, डायरेक्ट कॉल, पॉप अप प्ले,एस व्हॉईस, एस बीम, स्मार्ट स्टे ही या फोनची खास फिचर्स आहेत. हा फोन ८ आणि १६ जीबी स्पेसमध्ये उपलब्ध असून तो मायक्रो एस डी सपोर्टवर ६४ जीबी क्षमतेपर्यंत जाऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे.