गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री भाग्यश्री थोडीसी परेशान दिसत आहे. त्यामुळे काही जणांना वाटत असेल की तिला सिनेमा मिळत नसल्याने ती नाराज आहे. मात्र सध्या ती तिच्यासाठी नव्हे तर तिच्या मुलासाठी सिनेमाचा शोध घेत आहे. तिचा मुलगा अभिमन्यू आता २१ वर्षाचा झाला असून त्याला चांगल्या सिनेमातून लॉन्च करण्यासाठी सध्या ती प्रयत्नशील आहे.
सुमारे वीस वर्षापूर्वी ‘मैंने प्यार किया’ या सिनेमातून लोकप्रियता मिळवलेल्या भाग्यश्रीला कोणीच विसरू शकत नाही. त्यामुळे तीच सिनेमाचा शोध घेत असावी असे सर्वाना वाटणे साहजिक आहे, मात्र आता तिचा मुलगा इतका मोठा झाला असेल याची कल्पना कुणालाच नव्हती. तिचा मुलगा अभिमन्यू हा मोठा झाला असून तिच्यासाठी सध्या ती मोठ्या बॅनरच्या सिनेमाचा शोध घेत आहे.
त्यामुळेच आजकल ती सिनेमाच्या प्रत्येक इवेंटमध्ये सहभागी होऊन सर्वांची गाठ-भेट घेत आहे. त्याच वेळी ती प्रत्येकाशी अभिमन्यूची भेट घालत आहे. भाग्यश्रीच्या मते तिचा मुलगा अभिमन्यू खूपच फ्रेंडली आहे. काही बाबतीत तो खूपच स्ट्रिक्ट आहे. त्यामुळे आता त्याला लवकरच चांगल्या सिनेमाच्या माध्यमातून एन्ट्री मिळेल असे भाग्यश्रीला वाटते.