कर्करोगाच्या आजारातून परत भारतीय संघात स्थान मिळवलेल्या युवराज सिंगने मंगळवारी इंगलंडसोबतच्या सराव सामन्यात दमदार फलंदाजी करीत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी या सामन्यात ५९ रन काढून कसोटी संघासाठी दावेदारी मजबूत केली आहे. सध्या भारतीय संघात सहाव्या नंबरचे स्थान रिक्त आहे. त्यामुळे या जागी त्याची वर्णी लागण्याची श्यकता आहे.
दुसरीकडे अभिनव मुकुंद व मनोज तिवारीने सुद्धा चांगली फलंदाजी करीत निवड समितीला कुणाची निवड करवी यासाठी कोड्यात टाकले आहे. भारताने टॉस जिकून प्रथम फलदाजी करताना ९ गडी बाद ३६९ रन केले होते. या डावाचे प्रमुख आकर्षण म्हणजे युवराज सिंगने चोफेर फटकेबाजी करीत केवळ ८० चेंडूवर ५९ रन काढले , तर दुसरीकडे त्याला साथ देताना अभिनव मुकुंदने ७३ धावा केल्या. त्यासोबतच सलामीला खेळताना मनोज तिवारीने ९३ धावा केल्या. त्याचे शतक केवळ ७ धावाने हुकले. त्यामुळे आता नवीन निवड समितीपुढे संघात कुणाला संधी द्यावयाची यावरून पेचात टाकले आहे.
याशिवाय या सामन्यात अष्टपैलू इरफान पठाणने दमदार फलंदाजी करताना ४६ धावा केल्या. तर कर्णधार सुरेश रैनाने मात्र थोडीसी निराशा केली. त्याने केवळ २० धावा केल्या. १५ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला जाणार असून या सराव सामन्यात चांगली कामगिरी करणा-या खेळाडूना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे या सामन्यातील सर्वांच्या कामगिरीकडे निवड समितीचे लक्ष लागले आहे.