न्यूयॉर्क, ३१ ऑक्टोबर-सँडी चक्रीवादळाने अमेरिकेत हाहाकार माजवला आहे. १४४ किलोमीटर प्रतितास वेगाने धडकणारे हे वादळ काल आठ वाजता (अमेरिकन स्थानिक वेळेनुसार) न्यूजर्सीच्या किनार्यावर येऊन धडकले. यामुळे येथील १५ लाख घरांची वीज गायब झाली आहे. तसेच संपूर्ण शहर अंधारात बुडाले आहे. अमेरिकेतील इतर शहरांतील स्थिती गंभीर असून, सुमारे १४ हजार विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. न्यूयॉर्क प्रशासनने सांगितले आहे की या वादळामुळे आतापर्यंत १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर वादळामुळे न्यूयॉर्क शहरतील क्विंस परिसरात आग लागली आहे. सुमारे २५ घरांमध्ये आग पसरली असून वादळामुळे मदतकार्यात प्रचंड अडचणी येत आहेत.
पूर्वेकडील १२ राज्यांतील किनार्यालगत आणबाणी घोषित करण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे सुमारे ६ कोटी लोक बेघर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किनार्यालगतच्या शहरातील अनेक लोकांना घराच्या बाहेर काढण्यात येत असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. न्यूजर्सीतील विद्यापीठातील रुग्णालयाची वीज गायब झाल्याने तेथील रुग्णांना दुसरीकडे नेण्यात आले आहे. किनार्यावर वसलेल्या न्यूजर्सीबरोबर न्यूयॉर्क शहरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जात आहे. यामुळे शहर जवळपास मोकळे झाले आहे. न्यूयॉर्कमधील रेल्वे, बस आणि मेट*ो सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. शाळा, कॉलेज व सरकारी कार्यालयही बंद ठेवली आहेत. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी शहरात अनेक रहिवासी भागात पाण्याने वेढा दिला आहे. अनेक भागात वादळामुळे पाऊसही पडत आहे.
अमेरिकेतील सर्व शेअर व वायदे बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. ९-११ नंतर प्रथमच न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज बंद ठेवण्यात आला. अमेरिका सध्या दहशतवादी हल्ला किंवा अणुस्फोटाइतक्या भीषण संकटावस्थेत पोहोचला आहे. अमेरिकी राष्ट*ाध्यक्ष निवडणुकीचे उमेदवार मिट रोमनी यांनी चक्रीवादळाने फटका बसलेल्या राज्यातील प्रचार थांबवला आहे. राष्ट*ाध्यक्ष बराक ओबामा यांनीही या वादळाला मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याचे सांगत त्याकडे गंभीर्याने पाहावे असे म्हटले आहे. राष्ट*ाला संबोधित करताना ओबामा म्हणाले, हे एक मोठे नैसर्गिक संकट आहे. आपले प्राथमिक लक्ष्य लोकांचे जीव वाचवणे आहे. त्यासाठी प्रशासन मोठी मेहनत घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या वादळामुळे अनेक भारतीय न्यूजर्सीतील हॉटेलात अडकून पडले आहेत.
सोमवारी रात्री उशिरा ताशी ९० मैल वेगाने वाहणार्या विनाशकारी सँडी वादळाने नंतर ताशी १४४चा वेग गाठला आहे. वादळामुळे सर्व रस्ते ओस पडलेले दिसत आहेत. नेहमी लोकांच्या गर्दीने गजबजलेली सुपरमाकर्ेटस ओस पडली आहेत.