माझी बायको ५० कोटी रुपयांपेक्षा मौल्यवान आणि अनमोल : थरुर यांचे मोदींना प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी आपली पत्नी सुनंदा पुष्कर ही ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक अनमोल व महत्त्वाची असल्याचे सांगत नरेंद्र मोदींना उत्तर दिले आहे. तसेच ज्यांनी कधी आयुष्यात प्रेमच केले नाही त्याला बायकोची किंमत कशी कळणार अशा शेलक्या शब्दात सुनावले आहे. मोदींनी काल नाव न घेता थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांनाच ’५० कोटींची गर्लफ्रेंड’ असे संबोधले होते.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मंडी येथे बोलताना ’वाह क्या गर्लफ्रेंड है, आपने कभी देखी है ५० कोटी की गर्लफ्रेंड…?’ असे म्हणत शशी थरूर यांच्या खासगी आयुष्यावर बोचरी टीका केली होती.

Leave a Comment