
करीना लग्नानंतर लगेचच ग्लैमरच्या दुनियेत परतली आहे. ‘पीपल्स चॉइस अवॉर्ड्स’च्या वेळी करीनाने आयटम साँग सादर करून सर्वत्र पुन्हा एकदा धूम माजवली आहे. तिच्या या आयटम साँगवर बॉलीवूडमधील तिच्या अनेक सहकार्यांनी ठेका धरला होता.

करीना लग्नानंतर लगेचच ग्लैमरच्या दुनियेत परतली आहे. ‘पीपल्स चॉइस अवॉर्ड्स’च्या वेळी करीनाने आयटम साँग सादर करून सर्वत्र पुन्हा एकदा धूम माजवली आहे. तिच्या या आयटम साँगवर बॉलीवूडमधील तिच्या अनेक सहकार्यांनी ठेका धरला होता.
कलर्स चैनलच्यावतीने या अवार्ड फंक्शनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टीवी, बॉलिवुड, स्पोर्ट्स आणि संगीत क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीना ‘पीपल्स चॉइस अवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात आला होता. हा अवॉर्ड पब्लिक वोटिंगच्या मदतीने स्टार मंडळीना देण्यात आला. या फंक्शनमध्ये सहभागी झालेल्या अनेकांची नजर करीना आणि सैफ आली खान यांच्या जोडीवर होती. लग्नानंतर हे कपल पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या फंक्शनमध्ये करीना कपूरने काही दिवसापुर्वी रिलीज झालेल्या तिच्या ‘हिरोइन’ सिनेमातील आयटम सॉन्ग ‘हलकट जवानी’ वर बिंदासपने परफॉर्मेंस सादर केला. त्याशिवाय ती ‘छम्मक छल्लो’ या गाण्यावर सुद्धा थिरकली. या इवेंटमध्ये करीनाने परफॉर्मेंसवेळी ब्लैक टॉप आणि पिंक कलरचा घाघरा घातला होता.
करीना हज़्बंड सैफ सोबत परफॉर्म करील असे सर्वाना वाटत होते. मात्र सैफ आजारी असल्याने करीना एकटीच थिरकली.
प्रियंका चोप्राने यावेळी यश चोप्रा यांच्या सिनेमातील गाण्यावर परफार्म केला. करीनाशिवाय अभिनेत्री आणि सिंगर असलेल्या प्रियंकाने सुद्धा या इवेंट मध्ये चांगला परफार्म केला. यावेळी अमिताभ बच्चन , मेरी कोम, विजेन्दर सिंह, योगेश्वर दत्त यांना अवॉर्ड देण्यात आले तर यावेळी सलमान खान, परिणिती चोप्रा, माधुरी दीक्षित आदि मंडळीने हजेरी लावली.