इंडस्ट्रीजमध्ये जेवढे काही स्टार आहेत, त्याची सिक्योरिटी एकापेक्षा एक अशी तगडी आहे. जेवढा मोठा स्टार तेवढी बॉडीगार्ड्सची संख्या जास्त असे समीकरण ठरले आहे. मात्र बॉलीवूडचा टायगर असलेल्या सलमानची सिक्योरिटी व्यवस्था मात्र दबंग-२ च्या सेटवर मात्र कूचकमी ठरली. यावेळी सेटवर सलमानची सिक्योरिटी असतानाही सहा अनोळखी इसमांनी त्याच्या हातात हात देऊन निघून गेल्याने काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
सल्लूमियाचा विचार केला तर तो आता छोटा-मोठा स्टार नाही. त्यामुळे त्याच्या बॉडीगार्ड्सची संख्या सुद्धा जास्त आहे. त्याने सिक्योरिटीसाठी १२ बॉडीगार्ड्स तैनात ठेवले आहेत असे असतानाही त्याला त्याचा फटका बसला. दबंग-२ च्या सेटवर काही जन सलमानच्या हातात हात देऊन निघून गेले. त्यामुळे काही काळ सलमान खान चांगलाच वैतागला होता. सुरुवातीला हातात हात दिल्याने हे कोण तरी इन्वाइटेड गेस्ट अथवा क्रू मेंबर असतील असे त्याला वाटले. मात्र हे कोण तरी बाहेरचे व्यक्ती असल्यचा संशय आल्यानंतर सलमानचे बॉडीगार्ड्स जागे झाले व त्यांनी त्या सहाजणांना सेटच्या बाहेर हाकलून दिले.
या प्रकारामुळे काही काळ सेटवर तणावाचे वातावरण होते. सलमानची सिक्योरिटी इतकी तगडी असतानाही हे सहा जन सेटवर पोहचलेच कसे याची चर्चा मात्र सेटवर बराच काळ रंगली होती. याप्रकारामुळे गेल्या काही दिवसापासून सलमानची सिक्योरिटी पुन्हा वाढवली आहे.