गुजराथ प्रचारात रामदेवबाबांची उडी

अहमदाबाद दि.३०- योगगुरू रामदेवबाबा यांनी गुजराथेतील निवडणूक प्रचार दौर्या ची सुरवात आजपासून म्हणजे मंगळवारपासून केली. रामदेवबाबांनी काँग्रेस विरोधात प्रचार करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले असून त्यांचा प्रचारदौरा भावनगर जिल्ह्यातील आलमपूरपासून सुरू झाला आहे. ते पंचमहाल, नडियाद, बिलीमोरा भागात प्रचार करणार असून ८ नोव्हेंबरला त्यांचा प्रचारदौरा संपणार आहे.

काँग्रेसच्या विरोधात प्रचार म्हणजे भाजपला प्रमोट करणे नाही असा खुलासाही त्यांनी केला आहे. कांही काळापूर्वी रामदेवबाबांनी नरेंद्र मोदींवर स्तुती सुमने उधळली होती मात्र आता बोलताना त्यांनी काँग्रेसला पराभूत करू शकणार्या् कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची तयारी असल्याचे जाहीर केले आहे. ते म्हणाले दिल्लीतील रामलिला मैदानावर केलेल्या आंदोलनाच्या वेळीच निवडणुंकांत काँग्रसेविरोधात प्रचार करणार असल्याचे आम्ही जाहीर केले होते.

काँग्रेस हा या देशाला झालेला कॅन्सर असून तो निपटण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचेही सांगितले. काँग्रेसविरोधातील प्रचाराची सुरवात गुजराथ पासून करण्यात येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Comment