नवी दिल्ली दि.२९ – काँग्रेस आघाडी सरकारने रविवारी मंत्रीमंडळ फेरबदल केल्यानंतर आता आठवड्याभरातच काँग्रेसचे संघटनात्मक बदलही केले जाणार असून त्यात राहुल गांधी यांना महासचिव अथवा वर्कींग प्रसिडेंट हे महत्त्वाचे दोन नंबरचे पद दिले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
राहुल गांधी नंबर दोन पदावर ?
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय वारसदार कोण हा वादाचा मुद्दा मुळातच काँग्रेसमध्ये नाही. वारसदार राहुलच असतील हे नक्की आहे. अशावेळी त्यांना नंबर दोनचे पद दिले जाईल यातही कांही आश्चर्य नाही असे वरीष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही पदे कॉग्रेंसमध्ये फार क्वचित भरली गेली आहेत. १९८० त एन.एन बहुगुणा यांचे काँग्रेसमध्ये पुनरागमन झाल्यानंतर त्यांना महासचिव म्हणून बढती दिली गेली होती तर १९८३ साली कमलापती त्रिपाठी यांना वर्कींग प्रेसिडेंट म्हणून नियुक्त केले गेले होते
राहुल गांधी सध्या पक्षाच्या युवा शाखेचे महासचिव आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांत त्यांना पक्षाचा मॅस्कॉट म्हणून पुढे आणले जाणार आहे. राहुल यांना दोन्ही पैकी कोणते पद दिले जाईल इतकाच प्रश्न आहे. अर्थात सोनियांच्या विश्वासू लोकांची वर्णी संघटनेत असेलच पण तरूण रक्तालाही राहुल गांधी प्राधान्य देतील असाही अंदाज वर्तविला जात आहे.
