एन्टर द ड्रॅगन आणि फिस्ट ऑफ फ्यूरी या दोनच चित्रपटातून कुंग फू आणि कराटेची कमाल जगभरात पोहोचविणारा आणि खर्या अर्थाने मार्शल आर्टची ओळख जगाला करून देणारा चिनी अभिनेता ब्रूस ली याचे राहते घर विकण्यात येत असल्याचे वृत्त आहे. हाँगकाँगमध्ये असलेल्या या इमारतीत ब्रूस ली अखेरच्या दिवसांत राहात होता. अवघ्या ३२ व्या वर्षीच त्याचा अचानक अपघात मृत्यू झाला मात्र त्याच्या मृत्यूविषयी विषप्रयोगाचा संशय व्यक्त केला गेला होता.
कूंग फू बादशाह ब्रूस लीचे घर विक्रीला
सध्या हे घर यू पंगलीन यांच्या मालकीचे आहे. त्यांनी या ठिकाणी ब्रूस लीच्या वस्तूंचे संग्रहालय करण्यासाठी प्रयत्न केले त्यासाठी सरकारशी संपर्कही साधला मात्र सरकारकडून त्यांना अनुकुल प्रतिसाद मिळाला नाही. अखेर या जागेत हॉटेल उघडण्यात आले. मात्र तेही चालत नाही व हॉटेलचालकाने भाडे थकविल्याने अखेर हे घर विकण्याचा निर्णय घेतल्याचे पंगलीन यांचे म्हणणे आहे.
