पीटरसनचे एसएमएस प्रकरण संपले- कुक

इंग्लंडचा संघ शुक्रवारी भारतात येत असून या संघात वादग्रस्त ठरलेल्या केविन पीटरसनचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत. इंग्लंडचा कर्णधार अलिस्टर कुकने मात्र या वादावर केंव्हाच पडदा पडला असून भारताचा मुकाबला करण्यासाठी आम्ही नव्या जोमाने तयार असल्याचे पत्रकाराशी बोलताना सांगितले.

गेल्या आठवड्यात इंग्लंड संघाची बैठक झाली. त्यावेळी संघ व्यस्थापन व केविन पीटरसन यांच्यातील गेल्या काही दिवसापासून सुरु असलेला वाद कायम स्वरूपी मिटावा म्हणून इंग्लंडचा कर्णधार अलिस्टर कुकने महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच हा वाद मिटला आहे. पीटरसनच्या दृष्टीने गेले दोन महिना त्याच्यासाठी सर्वात कठीन काळ ठरला. मात्र आता सर्व काही सुरळीत झाले आहे. त्यामुळे आता आम्ही सर्वांनी आगामी भारत दोर्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले असल्याचे कुकने स्पष्ट केले.

दरम्यान , भारतीय संघाने इंग्लंड विरुद्दच्या अभ्यास सामन्यात फिरकी गोलंदाजाचा समावेश न केल्याने कुकने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या चार कसोटी सामन्याच्या मालिकेत त्यांचा फिरकी गोलंदाजाचा सराव होणार नाही. इंग्लंडचा सद्याचा संघ हा पूर्णपने संतुलित आहे. त्यामुळे हा दौरा निश्चितच आमच्यासाठी खूप काही शिकण्यासारखा ठरणार असल्याचेही कुक यावेळी म्हणाला.