कॉमेडीयन जसपाल भट्टी अपघातात ठार

भारताचा पहिला टीवी कॉमेडीयन जसपाल भट्टी यांचे गुरुवारी जलंदर येथे कार अपघातात निधन झाले. ते ५७ वर्षाचे होते.

उलटा पुल्टा आणि फ्लोप शो या टीवी सीरिअल मुळे ते घराघरात पोहोचले होते. आपल्या नर्म विनोदी शैलीतून मनोरंजन करताना त्यांनी सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न अतिशय तळमळीने समाजापुढे मांडले. व्यवसायाने इंजिनिअर असलेले भट्टी पंजाब सरकार मध्ये नोकरी करत होते. टीवी वरील आपल्या विनोदी सीरिअल मधून समाजाचा आरसाच त्यांनी जनतेपुढे मांडला.

त्यांची पॉवर कट हि फिल्म २६ आक्टोबर ला रिलीज होत असून त्याच्या प्रमोशन साठीच ते जालंदरला जात असताना हा अपघात झाला.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जसपाल भट्टी याच्या अचानक निधनाबद्दल दुख व्यक्त केले असून भट्टी हे अतिशय बुद्धिमान कॉमेडीयन होते असे उद्गार काढले.