रोम्नींच्या मुलाने ओबामांची माफी मागितली

वॉशिंग्टन,२५ ऑक्टोबर-अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोम्नी यांचा मोठा मुलगा टॅग रोम्नी याने अध्यक्ष बराक ओबामा यांची माफी मागितली आहे.

न्यूयॉर्कमध्ये १६ ऑक्टोबरला ओबामा आणि रोम्नी यांच्यात झालेल्या वाद-विवादानंतर एका रेडिओला दिलेल्या मुलाखतीत टॅम रोम्नी यांनी ओबामांबद्दल आक्षेपार्ह वत्तव्य केले होते. त्यानंतर सोमवारी रात्री या दोघांमध्ये झालेल्या वाद-विवादानंतर टॅग रोम्नी यांनी माफी मागितल्याचे वृत्त, एबीसी न्यूज या वृत्तवाहिनीने दिले आहे.
सोमवारी वाद-विवादानंतर आपल्या कुटुंबीयांसह मंचावर आलेल्या टॅग रोम्नी यांनी ओबामांच्या हातात हात देत त्यांची माफी मागितली.