बॉलीवूडचा टायगर म्हणजेच सलमान खान आणि देशी गर्ल म्हणून ओळखली जात असलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा चांगले दोस्त झाले आहेत. त्यामुळेच दोन दिवसापूर्वीच टायगर खानच्या घरातून पाहटे पाच वाजता बाहेर निघताना अनेकांनी प्रियंकाला पहिले. सध्या दोघेही दुबई जाण्याची तयारी करीत असल्याचे समजते.
डिसेंबर महिन्यात सलमान आणि प्रियका एका व्यासपिठावर येऊन कार्यक्रम सादर करण्यची शक्यता आहे. या कार्यक्रमाचे आयोजन दुबई येथील एका नागरिकाने केले असल्याचे समजते. त्यामुळे दोघे जन या स्टेज शोच्या निम्मिताने २००८ सालानंतर एकत्रित येणार आहेत. २००८ साली गाड तुस्सी ग्रेट हो या सिनेमानंतर हे दोघे एकत्र येणार आहेत. या सिनेमानंतरच या दोघामधील संबध काही काळ बिघडले होते. मात्र आता कैतरीनाने दोघामध्ये तडजोड केल्याने त्यांच्यातील संबध पुन्हा सुरळीत झाले आहेत.
नमस्ते लंडन या सिनेमात प्रियंका काम करणार होती, मात्र तिला वगळून कैतरीनाला या सिनेमात संधी दिली होती. सलमानच्या शिफारसीमुळे कैतरीनाला हा सिनेमा मिळाला होता, त्यामुळे प्रियंका सलमानवर चिडली होती. त्याशिवाय प्रियंका आणि शाहरुख खान यांच्यातील वाढती जवळीकता सलमानला पसंत पडली नव्हती, त्यामुळे या दोघातील संबध बिघडले होते. मात्र आता कैतरीनाने पुढाकार घेतल्याने दोघातील मैत्री पुन्हा एकदा दृढ झाली आहे.