लग्नाची तयारी करत आहे सुश्मिता

गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडमध्ये लग्नाचा सिझन चालू झालेला दिसत आहे. काही दिवसापुर्वी सैफ अली खान व करीना कपूर या बहुचर्चित जोडीने लग्न केल्यापासून बॉलीवूड मधील अविवाहित मंडळीना लग्नाचे डोहाळे लागलेले दिसत आहेत. त्यामुळेच अभिनेता जॉन अब्राहीम व साजिद खानने ते लग्नासाठी तयार असल्याचे जाहीर केले. तर तिकडे सुश्मिता सेन सुद्धा लग्नासाठी भलतीच उतावीळ झाली आहे. पुढील वर्षी लग्न करण्या ची तयरी तिने आतापासुनच चालवली आहे.

या लग्नाची तयारी करीत असल्याच्या बाबींना खुद्ध सुश्मिता सेन हिने दुजोरा दिला आहे. सुश्मिता म्हणाली, ‘ मी लग्नाची तयारी सध्या करीत आहे. माझ्या वडिलाच्या मते मी पारंपारिक पद्धतीने लग्न करावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्या प्रकारेच मी लग्न करणार आहे. त्यामुळे सध्या मी लग्नाच्या तयारीत बिझी आहे.’

लग्न लवकरच करणार असे जरी सुशने जाहीर केले असले तरी, कोणासोबत लग्न करणार हे मात्र तिने लपवून ठेवले आहे. यापूर्वी डायरेक्टर मुदस्सर अजीज व रणदीप हुड्डा सोबत तिने काही काळ डेटिंग केले आहे. गेल्या काही दिवसापासून ती बिजनेसमेन इम्तियाज कत्रीच्या खूप जवळ आली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ती कोणाशी लग्न करणार या प्रश्नाचे उत्तर आगामी काही दिवसातच भेटेल.