मॉडेल पासून अभिनेत्री झालेली नेहा धुपिया गेल्या काही दिवसापासून फॉर्म मध्ये आहे. बॉलीवूडमध्ये ती शबाना आझमीला रोल मॉडेल समजते. आगामी काळात तिला शबाना सारखे बॉलीवूडमध्ये दीर्घ काळ काम करायचे आहे. शबाना आझमीने सिनेमासृष्टीत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविला होता. शबनाने त्याकाळी सिनेमात काम करीत असताना व्यवसायिक सिनेमा असो की, कला क्षेत्राला प्राधान्य देणारा सिनेमा या मध्ये तिने सशक्त अभिनय करून सर्वांची मने जिंकली होती.
नेहा म्हणाली, ‘ सिनेमात काम करताना मला आता खूप वर्षाचा अनुभव आला आहे. मी अनेक वेगवेगळ्या सिनेमात काम केले आहे. मी माझ्या करियरवर पूर्णपणे संतुष्ट असून आगामी काळातही मला सिनेमातून सतत काम करण्याची इच्छा आहे. या आठवड्यात माझा ‘रश’ हा सिनेमा रिलीज होत असून त्या सिनेमात माझ्या सोबत इम्रान हाश्मीने काम केले आहे. या सिनेमात मी एका महत्वकांशी तरुणीची भूमिका केली आहे. या सिनेमाकडून मला खूप काही अपेक्षा आहेत, त्या पूर्ण होतील असे वाटते.’
या सिनेमाचे शूट ५० दिवस पंजाबमध्ये सुरु होते. त्यामुळे आगामी काळात पंजाबी सिनेमाला खूप महत्व येणार असे दिसते . या सिनेमाशिवाय नेहा आगामी काळात इम्रान हाश्मी सोबत ‘उंगली’ या सिनेमातून काम करीत आहे.