पाच वर्षात विदेशात २९ भारतीयांना फाशीची शिक्षा

ठाणे,२५ ऑक्टोबर-मागील पाच वर्षात गुन्हेगारी आरोपामुळे जगभरात २९ भारतीयांना फाशीची शिक्षा झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने माहितीचा अधिकार (आरटीआय) अंतर्गत विचारलेल्या एक प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

आरटीआय कार्यकर्ते ओम प्रकाश शर्मा यांना दिलेल्या माहितीत मंत्रालयाने सांगितले की, संयुक्त अरब अमीरातमध्ये २१, कुवैत मध्ये सहा, इंडोनेशिया व ईरानमध्ये एक-एक भारतीयाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. यात २७ जणांना हत्येसाठी दोषी ठरवण्यात आले. यांच्यावर अपहरण, मृतदेह लपवणे, चोरी, व्यभिचार व नशा करण्यासारखे आरोपही लागले.

दोन जणांना नारकोटिक्स अधिनियम व ड*ग्स अधिनियमा अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली गेली. मंत्रालयानुसार एकुण १०,६४७ भारतीयांना विविध गुन्हेगारी प्रकरणात विविध देशात तुरूंगाची शिक्षा सुनावली गेली. यात सर्वात जास्त संयुक्त अरब अमीरातमध्ये ४३१५ भारतीय त्यानंतर बांग्लादेशमध्ये २००८, कुवैतमध्ये ११६१, चीनमध्ये ६७३, ओमानमध्ये ४२९, ब्रिटेनमध्ये ४२६ व इतर देशात २५० पेक्षा कमी लोकांना दोषी ठरवले गेले.