ऑकलंड- आपल्याला बेडूक, सुसर, मगर ,कासव हे उभयचर म्हणजे पाण्यात व जमिनीवर राहू शकणारे प्राणी म्हणून माहिती असतात. मात्र न्यूझीलंडचे उद्योगपती एलेन गिब्स यांच्या गिब्स स्पोटर्सने बनवलेली ’द क्वाडस्की’ ही कार उभयचर असून, ती पुढील महिन्यात अमेरिकेत उपलब्ध होणार आहे. ही गाडी रस्त्यावर तसेच पाण्यातही पळू शकणार आहे. या कारच्या संशोधनासाठी व निर्मितीसाठी कंपनीला १८ वर्ष लागली आणि त्यासाठी २०० मिलियन डॉलर खर्च आला आहे. एवढेच नाही तर यासाठी तब्बल ३०० पेटेंट घेण्यात आली आहेत.
पाण्यात चालणारी अनोखी बाईक कार!
ही आकाराने छोटी कार असून ती बाईक कार प्रकारात मोडते. रस्त्यावर चाकाच्या मदतीने चालणारी ही बाइक कार पाण्यात मरीन जेट प्रोप्लशन सिस्टमवर चालणार आहे. ही कार पाण्यात जाताच पाच सेकंदात चाके बंद होतील. तसेच ही कार पाण्यात दोन तास चालू शकते. द क्वाडस्की’- ही कार न्यूयॉर्क, बोस्टन, ग्रेट लेक्स, फ्लोरिडा आणि टेक्सासमधील बाजारात लवकरच दिसेल. ’द क्वाडस्की’ला साहसी लोक, युवा, मासेमारी करणारे, खेळाडू आणि लष्कर व सागरी दला यांची पसंती मिळू शकते.
पहिल्या वर्षी १ हजार ’द क्वाडस्की’ विकण्याची गिब्स कंपनीला आशा आहे . याचबरोबर स्की वाटर स्पोटर्समध्ये याचे उत्पादन वेगाने विकले जाईल. द क्वाडस्कीची किंमत ४० हजार डॉलर (सुमारे २१.१५ लाख रु.) असेल
