दानात मिळालेल्या हृदयाच्या आधाराने गाठली पंचविशी
लंडन – ब्रिटेनमध्ये पहिळे वहिले हृदय प्रत्यारोपण करण्यात आलेल्या केली डेविडसन-ओली हिने वयाची २५ वर्षे पुरणे केली आहेत. तिच्या हृदयाचे ऑपरेशन करण्यात आले होते तेव्हा ती फक्त पाच महिन्याची होती.
आपल्या या ऑपरेशनला २५ वर्षे झाल्याच्या जल्लोषात ओलीने रूग्णालयात जगभरातून आलेल्या डॉक्टरांची भेट घेतली. ती त्या ३० मुलांना देखील भेटली जे एक वर्षापेक्षा जास्त कमी वयाचे होते आणि ज्यांचे हृदय प्रत्यारोपित करण्यात आले होते. एक दुकानात सेल्स अॅडवाइजर म्हणून काम करणारी डेविडसन विश्व प्रत्यारोपण कार्यक्रमात नेहमी सहभाग घेते आणि तिने आपले जीवन या मोहिमेला समर्पित केले आहे. ती अवयव दान करणार्याच्या यादीत जास्तीजास्त लोकांचे नाव जोडू इच्छिते.
अवयवदान विभागाचे सहाय्यक संचालक अँथनी क्लार्कसन म्हणतात की, ब्रिटेनमध्ये अवयव प्रत्यारोपण करण्याच्या प्रतिक्षेत दररोज तीन मुलांचा मृत्यू होतो.
