रोसवेल: अंतराळाच्या दारातून १.२८ लाख फूट उंचीवरून स्काय डाईव्ह घेण्याचा विश्वविक्रम ऑस्ट्रियाच्या फेलिक्स बॉमगार्टनर याने केला आहे. एवढ्या उंचीवरून ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने फेलिक्स पृथ्वीकडे झेपावला.

हेलियम फुग्याच्या सहाय्याने अंतराळाच्या दारात पोहोचलेल्या फेलिक्सने सुरक्षिततेसाठी खास बनविलेला सूट परिधान केला होता. १.२८ लाख फूट उंचीवरून तो पृथ्वीकडे झेपावला. पृथ्वी जवळ येताच त्याने आपले पॅराशूट उघडले आणि रविवारी रात्री १२ च्या सुमारास न्यू मेक्सिकोतील रोसवेल या ठिकाणी सुरक्षित पोहोचला.
यापूर्वी या विश्वविक्रमासाठी फेलिक्सने केलेले प्रयत्न हवामानाची अनुकूलता नसल्याने पुढे ढकलावे लागले होते.