
नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर-हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी किंग खान शाहरुखशी संफ करण्यात आला आहे. ’चक दे इंडिया’मध्ये हॉकी प्रशिक्षकाची दमदार भूमिका साकारणार्या शाहरुखला या चित्रपटासाठी घेण्यात आल्याच्या अटकळी बांधल्या जात आहेत.
वृत्तानुसार करण जोहरच्या ’अग्निपथ’ची पटकथा लिहिणारी इला बेदी दत्त या चित्रपटाची पटकथा या वर्षाअखेर तयार करणार आहे. इलाच्या मते, अलीकडेच मी शाहरुखला भेटले आणि या प्रोजेक्टवर त्याच्याशी चर्चा केली. आमच्यासाठी तो ध्यानचंदच्या भूमिकेसाठी एकदम फिट आहे. या प्रोजेक्टसाठी तो लवकरच होकार देईल, अशी आशा आहे.
फिल्म निर्माता पूजा शेंट्टीने सांगितले की, ध्यानचंद यांचा मुलगा अशोक चंद यांची या चित्रपटनिर्मितीसाठी परवानगी आणि अधिकार घेण्यात आले आहेत.
