
नवी दिल्ली,१५ ऑक्टोबर-भारतात विवाह खूप धूमधडाक्याने साजरा केला जातो. लोक पूर्ण प्रयत्न करतात की, खूप सजावट केली जावी, वरातीच्या स्वागतात कोणतीही कमतरता राहू नये आणि भोजनाला तर काय म्हणावे! परंतू याच विवाहाचे भोजन एखाद्या समस्येचे कारण तर बनत नाही.
बंगळुरूच्या एक संस्थेला एक संशोधन केल्यनांतर आढळले की, विवाह भोजनात बळजबरी नासडी केली जाते.
बंगळुरूचे युनिवर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चरल साइन्सच्या एक टीमने शहरात विवाह करवणारे ७५ ’मॅरिज हॉल’ चे सहा महिन्यापर्यंत अध्ययन केले. संशोधनात आढळले की, फत्त* बंगळुरू शहरात विवाहात सुमारे ९५० टन खाद्य पदार्थाची नासडी होते. युनिवर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चरल साइन्सचे कुलपती के नारायन गौडा यांनी सांगितले, ’बंगळुरूमध्ये सुमारे ५३० मॅरिज हॉल आहे जेथे वार्षिक एक अंदाजानुसार ८४,९६० विवाह होतात. प्रत्येक विवाहात सरासरी एक तृतीयांश भोजन वाया जाते आणि जर प्रत्येक थाळीचे दर चाळीस रूपये लावले तर वर्षात ३३९ कोटी रुपयाचे भोजन विवाहात वाया होते. समस्या फत्त* भोजन फेकण्याची नाही, विवाहच्या भोजनात कॅलरी देखील आवश्यकतेपेक्षा जास्त असते. भारतात जेथे कुपोषणाची मोठी समस्या आहे तेथे मग आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीयुत्त* भोजप खाऊ घालणे देखील एक प्रकारची नासडी आहे.
उध्वस्तीकरण
ते म्हणतात विवाह भोजनात एक थाळीत १२३९ कॅलरी असू शकते जी एक मुलासाठी पूर्ण दिवसात आवश्यक कॅलरीच्या बरोबरी आहे. समस्येवर ताबा मिळवण्यासाठी लोकांमध्ये जागृता आणणे आवश्यक आहे तसेच सरकारने देखील आवश्यक कायदा बनवायला पाहिजे. भारतात कुपोषणाला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आतच ’राष्ट्रीय लाज‘ म्हटले होते.
