नवी दिल्ली: माहितीच्या अधिकाराचा अनेकदा गैरवापर होत असून त्यावर मर्यादा आणण्याची आवश्यकता असल्याचे मत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली: माहितीच्या अधिकाराचा अनेकदा गैरवापर होत असून त्यावर मर्यादा आणण्याची आवश्यकता असल्याचे मत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले.
माहिती अधिकाराच्या कायद्याचा वापर करून एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनाची गोपनीयता धोक्यात येत असेल तर माहितीच्या अधिकाराच्या मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे. मात्र या मर्यादा ठरविणे हे मोठे आव्हानात्मक काम असणार आहे; असे पंतप्रधानांनी माहिती आयुक्तांच्या सातव्या परिषदेत सांगितले.
माहितीचा अधिकार आणि व्यक्तिगत गोपनीयता याची सांगड घालणे आवश्यक असून केवळ हा अधिकार वापरून कोणाला त्रास देणे अथवा केवळ त्रुटी दाखवून देणे अयोग्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.