नवी दिल्ली: देशाचतील सर्व गावात आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे २४ तास किफायतशीर दरात वीज पुरवठा करणे हे सरकारचे पुढील ५ वर्षातील मुख्य लक्ष्य असेल; अशी ग्वाही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली.

नवी दिल्ली: देशाचतील सर्व गावात आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे २४ तास किफायतशीर दरात वीज पुरवठा करणे हे सरकारचे पुढील ५ वर्षातील मुख्य लक्ष्य असेल; अशी ग्वाही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली.
भारतीय उद्योग महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऊर्जाविषयक आंतराराष्ट्रीय परिसंवादात सिंग बोलत होते.
देशाच्या ६ लाख खेड्यांपर्यंत विद्युत पुरवठा करण्याचे आमचे उद्दीष्ट असून या काही वर्षात १ लाखाहून अधिक गावांपर्यंत वीज पोहोचविण्यात आली आहे. आता काही हजार कुटुंब विजेपासून वंचित असून त्यांच्यापर्यंत वीज पोहोचविण्यात सरकार यशस्वी ठरेल; असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला.
विजेचा तुटवडा ही केवळ भारतासमोरील समस्या आहे; असे नाही; तर जगभरातील अनेक देशांना वीज पुरात नाही. जगभरातील १ अब्जाहून अधिक लोकांना विजेचा पुरवठा होत नसल्याचा दावाही पंतप्रधानांनी केला.