मालकाला फॉलो करणारी सूटकेस

लंडन -मालकाच्या मागून जाणारी रोबोटिक सुटकेस स्पॅनिश संशोधकाने तयार केली असून स्मार्टफोनच्या ब्लूटूथचा त्यासाठी वापर करण्यात आला आहे. हॉप असे या सूटकेसचे नामकरण करण्यात आले आहे.

रॉडरिगो गार्सिया याने ही सूटकेस तयार केली असून फोनचे सिग्नल स्वीकारणारे तीन सेन्सर या सूटकेसमध्ये बसविण्यात आले आहेत.त्याला कॅटरपिलर ट्रेक कडून पॉवर सप्लाय केला जातो. ही सूटकेस स्वतःच कुलुपबंद होते आणि मालक निघाला की त्याच्यामागून जाते. सिग्नल बंद पडला तर तशी सूचना मालकाला त्याचा स्मार्टफोन व्हायब्रेट होऊन दिली जाते. स्पेनच्या जेम्स डायसन अॅवॉर्डची ही सूटकेस मानकरी ठरली आहे. गार्सियाच्या मते त्याला अजून थोडे फिनिशिग करणे आवश्यक आहे तसेच ती बनविण्यासाठी चांगली टीम आणि अनुदान मिळण्याचीही गरज आहे.