गेल्या काही दिवसापासून द्बंग गर्ल सोनाक्षी सिन्हा मित्राच्या शोधात होती. तिला नवीन मित्र मिळाला आहे. सध्या सोनाक्षी सिन्हा पटियाला येथे ‘सन ऑफ सरदार’च्या शूट मध्ये व्यस्त आहे. त्याठिकाणी तिला सिम्बा नावाचा नवीन दोस्त मिळाला आहे. आता हा सिम्बा कोण आहे, याबाबत तर्कवितर्क लढविले जात असतील. सिम्बा हे कुत्र्याचे पिल्लू आहे. या दोघाची मैत्री सध्या बॉलीवूडमध्ये मात्र चर्चेचा विषय झाली आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसापासून ‘सन ऑफ सरदार’च्या शुटींग स्थळापासून काही अंतरावर रोटविलर जातीचे छोटे कुत्रे बांधण्यात आले आहेत. या कुत्र्यापैकी एक छोटेसे कुत्रे सोनाक्षीला खूप आवडले आहे. त्यामुळे हे कुत्रे सोनाक्षी सतत सोबत घेऊन फिरत असते. त्याचे लाडाने सिम्बा हे नावदेखील तिनेच ठेवले आहे.
शुटींगच्या ठिकाणी सोनाक्षी आणि सिम्बाची गाढ मैत्री झाली आहे. याठिकाणी सोनाक्षी सिन्हा शुटींग संपल्यानंतर मिळलेला वेळ ती सिम्बा व आणखीन काही कुत्र्याच्या लहान पिला समवेत खेळण्यात घालवते. आगामी काळात येत असलेल्या दिग्दर्शक अश्विन धीरच्या ‘सन ऑफ सरदार’ सिनेमात सोनाक्षीशिवाय अजय देवगण, संजय दत्त व जुही चावला प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.