राणीला पाहवी लागली सलमानची वाट

गेल्या काही दिवसापासून टायगर सलमान खानची गणना इंडस्ट्रीजमधील टॉपच्या स्टार मंडळीत केली जाते. त्यामुळे सलमान खानची काही वेळ तर सोबत मिळावी म्हणून बॉलीवूडमधील इतर स्टार मंडळी त्याची वाट पाहत बसलेले असतात. खंडाला गर्ल राणी मुखर्जी कधीच शुटींगच्या सेटवर वेळेवर पोहचत नाही, मात्र तिला सुद्धा सलमान खानची वाट पाहत तीन तास वेटिंग करावे लागले. एवढा वेळ थांबून तिने शेवटी सलमानची भेट घेतलीच.

राणी मुखर्जी सध्या तिच्या ‘अइय्या’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या कामात बीझी आहे. ती प्रमोशनच्या कामासाठीच कर्जत येथील बिग बॉसच्या सेटवर गेली होती. शूटींगसाठी तिला संध्याकाळी आठचा टायमिंग देण्यात आला होता. त्यामुळे ती याठिकाणी आठ वाजन्यापूर्वीच पोहचली होती. मात्र रात्रीचे १० वाजले तरी सलमान खान त्याठिकाणी पोहचला नव्हता. त्यामुळे राणी मुखर्जी चांगलीच वैतागली होती. रात्री १० वाजता ती शो मधून निघून जाण्यच्या विचारात होती. मात्र त्याठिकाणी उपस्थित असलेल्यानी तिची समजूत काढली. त्यानंतर सलमान आल्यानंतर रात्री ११ वाजता तिचे शुट पूर्ण झाले.

राणी मुखर्जी या ठिकाणी किमान तीन तास तरी सलमानची वाट पाहत बसली होती. राणी सलमान हा चांगला मित्र असल्याने इतका वेळ वाट पाहत थांबली होती की तिच्या सिनेमासाठी थांबली होती याची चर्चा मात्र सेटवर रात्री उशिरापर्यंत रंगली होती.

Leave a Comment