करीनाला करायचाय हलका फुलका सिनेमा…

‘हिरोईन’नंतर करीना कपूर पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी आतूर झाली आहे. ‘हिरोइन’सारखी बोल्ड भूमिका केल्यानंतर करिनाचे आता ‘सॉफ्ट टार्गेट’ कडे वळली आहे. सॉफ्ट टार्गेट म्हणजे, तिला आता हलका-फुलका सिनेमा करायचा आहे.

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा सिनेमा करण्याच्या विचारात करिना आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाचे काम पुनित मल्होत्रा यांच्या कडे सोपवले गेले आहे. हिरोइन चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केल्यानंतर करीनाने थोड्या काळासाठी ब्रेक घेतला होता. तिच्या आगामी चित्रपटात ती पुन्हा एकदा इमरान खान सोबत दिसणार आहे.

पुनित मल्होत्राचे सिनेमे पारंपारिक विषयावरचे नाच-गाण्यांनी भरलेले असतात. करीनालाही असाच सिनेमा आता करायचाय. सध्यातरी या आगामी सिनेमाचे नाव ठरवण्यात आलेले नाही.