धनुश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

बालासोर,दि. ५ – अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पृथ्वी या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या नौसेनेच्या आवृत्तीची आज भारताने यशस्वी चाचणी केली. ओडीशातील समुद्रातील एका नौसेनच्या जहाजातून क्षेपणास्त्र सोडण्यात आले. नौसेनेच्या आवृत्तीचे नाव ’धनुश’ असे आहे.

संपूर्णपणे देशी बनावटीचे हे क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५० किलोमीटर अंतरापर्यंत असून ५०० किलो वजनापर्यंतची अण्वस्त्रे वाहुन नेऊ शकते. ’धनुश’ क्षेपणास्त्र जहाजविरोधी अस्त्र म्हणून वापरण्यात येऊ शकते. आजची चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरली. निर्धारित करण्यात आलेली सर्व लक्ष्ये क्षेपणास्त्राने भेदली, असे डीआरडीओच्या प्रवक्त्याने सांगितले.