स्टीव्ह जॉब्जविना तंत्रज्ञान क्षेत्र पोरके

नवी दिल्ली दि. ५ – गेल्यावर्षी ५ ऑक्टोबर २०११ रोजी स्टीव्ह जॉब्सने जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या अकाली निधनानंतर अँपलच्या काम करण्याच्या पध्दतीत बराच फरक झाला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रत्येकालाच जॉब्स यांची ऊणीव जाणवत आहे. जॉब्ज यांच्या निधनानंतर अँपलला बाजारात सॅमसंग सारख्या कंपनीसोबत टक्कर देण्याची वेळ आली आहे. 

जॉब्स यांच्या सोबत काम करणार्‍या एका सहकार्‍याने सांगितले की, जॉब्ज यांचे ओरडणे आम्ही सगळ्यात जास्त ’मिस’ करत आहोत. एखाद्या नविन फोनच्या लॉन्चींगच्या वेळी अथवा एखादा फोन खरेदी करतांना सामान्य माणसाच्या तोंडी देखील स्टीव्ह जॉब्ज यांच्या शिवाय स्मार्टफोनचे विश्व अधूरे असल्याचे ऐकायला मिळत आहे. 

स्टीव्ह यांच्या जाण्यानंतर काही जाणकारांनी म्हटले आहे की, जॉब्ज यांच्यानंतर काही वेगळ तयार होतांना दिसत नाहीये. अर्थात स्टीव्ह यांच्या निधनानंतरही अॅपलच्या नफ्यात वाढ झाली आहे. पण, याचे सर्व श्रेय जॉब्ज यांना देणे योग्य ठरेल. सध्या असलेले अँपलचे प्रमुख टिम कुक देखील जॉब्ज यांच्या विचारांनी काम करतील का? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. 

तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्या वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतात. अँपलकडेही अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्या स्टीव्ह जॉब्ज जाता-जाता त्यांच्या टीमला देवून गेले. परंतु, अशी कोणती गोष्ट आहे जी स्टीव जॉब्ज यांच्या जाण्याने राहून गेली आहे.

जॉब्ज यांच्या जाण्याने प्रोडक्ट विकण्याची कला गेली. प्रत्येक कामातील अचुकता आणि नेमकेपणा जॉब्ज यांच्या सोबत गेला आहे. एखादी गोष्ट बाजारात दिसतांना साधारण दिसते.पण, त्या गोष्टीकडे बाजाराच्या दृष्टीने बारकाईने बघणे कॉर्पोरेट जगाला जॉब्ज यांनीच शिकवले. ही बारकाईने बघण्याची कला देखील त्यांच्या सोबत गेली असल्याची भावना तज्ञ व्यक्त करत आहेत.